गणपती विसर्जनांसाठी तलावांची स्वच्छता करण्याची मागणी
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
काही दिवसांत गणपती चे अगमन होणार असून,मात्र अगमना – नंतर विसर्जन होत असते.मात्र काही गावामध्ये विसर्जनांची सोय उपलब्ध नसल्यामुळे शेकडो अंतर जावून विसर्जन करावे लागते.मात्र ग्रूप ग्राम पंचायत माजगांव हद्दीत असलेल्या माजगांव येथिल तलाव पाण्यांने पुर्ण भरले असून त्यावरती शेवाळी निर्माण झाली आहे.सदर या ठिकाणी निर्माण झालेली शेवाळी काढण्यात यावी या उद्देशाने ग्रूप ग्राम पंचायत सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या कडे तलाव स्वच्छता चा करण्यांची मागणी करण्यात आली.

ग्रामस्थांच्या मागणी नुसार सरपंच यांनी तलावांची पाहणी करून लवकरात – लवकर शेवाळी काढण्यात येणार असल्यांचे सांगितले.सदर या तलावावर निर्माण झालेली शेवाळी काढल्यामुळे गणपती विसर्जनांस कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.सदर या ठिकाणी काही महिन्यापूर्वी घाट बांधण्यात होते.सदर ग्रामस्थांच्या मागणीस नुसार लवकरच या ठिकाणी तलावांची स्वच्छता करण्यात येणार असल्यांचे सरपंच यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
यावेळी या तलावांची पाहणी करतांना जयेश स पाटील,तेजस पाटील,विजय पाटील, ज्ञानेश्वर भोईर,किशोर काठावले,संदीप काठावले अदि तरुण वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment