Press "Enter" to skip to content

सीनियर – जुनियर क्रिकेट क्लब तर्फे दहावी, बारावी व पदवीधर मुलांचा गुणगौरव

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

पनवेल शहरातील जेष्ठ नागरिक सभागृहात सीनियर – जुनियर क्रिकेट क्लब २०२१- २०२२ चा गुणगौरव सोहळा दहावी बारावी व पदवीधर मुलांचे कौतुक करून थाटात संपन्न झाला .

सदर सीनियर – जुनियर क्रिकेट क्लबची स्थापना झाल्या पासून विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असतात असाच प्रकारे यंदा ही दहावी बारावी मध्ये पदवीधर मुलांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर ययाती गांधी, कर्णधार प्रमोद पाटील, खजिनदार त्रिशूळ म्हात्रे, माजी कर्णधार भाई, सुभाष पाटील, प्रफुल पेंडसे आदी उपस्थित होते यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला .

क्लबचे आधारस्तंभ संजय पाटकर, ऍड. चंद्रशेखर वाडकर , आदींसह कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर समिता गांधी, प्रस्तावना डॉक्टर नितीन पोवळे यांनी केले यावेळी कोरोना काळात ज्या डॉक्टरने सेवा दिली त्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला त्यात सुखम हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष जाधव व त्यांच्या पत्नी डॉक्टर रवींद्र राऊत, डॉक्टर नितीन पोवळे, डॉक्टर आशिष गांधी, डॉक्टर मिलिंद जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद पाटील, त्रिशूळ म्हात्रे, प्रफुल पेंडसे, नितीन पाटील, प्रदीप पाटील, भाई पाटील,रवींद्र राऊत, सुहास देशमुख, अप्पू कुंभार, विजय पाटील, कुणाल सावंत, केदार माने, अशोक भगत, विक्रम घरत, सचिन डांगरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते . यावेळी बोलताना डॉकटर ययाती गांधी यांनी सांगितले कि आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाबरोबर खेळामध्ये सुद्धा रस घेणे आवश्यक आहे व हा क्लब सर्वाना एकत्रित करून क्रिकेट सह इतर सामाजिक बांधीलकीचे उपक्रम राबवित असल्याने त्याचा मला मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगून यशस्वी विध्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.