Press "Enter" to skip to content

गढूळ पाण्याचा पुरवठा

खारघर शहरात स्वाईन फ्ल्यू, हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

सिटी बेल ∆ खारघर ∆ संजय कदम ∆

खारघर शहरात स्वाईन फ्ल्यू, हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच शहरात सध्या विविध ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे नवे संकट उभे ठाकले आहे.

खारघरमधील घरकुल तसेच सेक्टर 12 मधील विसावा, शिवाजी, सामुद्रिका, जागृत, सूर्योदय, शिवसागर या सोसायट्यांना सध्या दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे.

याबाबतच्या तक्रारी रहिवाशांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केल्या आहेत, मात्र सिडकोने पाण्याची तपासणी केल्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगितले आहे. या पाण्याला वेगळाच प्रकारचा वास येत असल्यामुळे रहिवासी चिंतेत आहेत.

सेक्टर 14 मेट्रो पुलाखाली जलवाहिनी दुरुस्तीच्या मातीमुळे पाणी गढूळ झाल्याचे सिडकोकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ही समस्या तत्काळ दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दहा दिवसांत पाणीटंचाईवर तोडगा खारघरमधीप सेक्टर 34 ते 36 परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

याबाबत सोसायटीच्या शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायतकर यांची भेट घेतली होती. या बैठकीत सेक्टर 34 ते 36 परिसरात सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सोसायटीला भेट देऊन पाहणी करून ही समस्या दहा दिवसांत सोडवतील, असे आश्वासन दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.