Press "Enter" to skip to content

अव्वल कारकून नितीन परदेशी यांच्या कामगिरीचा गौरव

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

खालापूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून नितिन फुलसिंग परदेशी यांनी जिल्हा महसूल विभागात उल्लेखनीय कामकाज करुन महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी प्रयत्न केल्याने महसूल दिनाचे औचित्य साधून नितिन फुलसिंग परदेशी यांना जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले.

दरम्यान खालापूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून नितिन परदेशी यांच्या कामकाजातील चोखपणा याचे नेहमीच कौतुक होत आहे.त्यांनी याअगोदर चौक मंडळ अधिकारी, खालापूर तहसिल महसूल खाते आणि नुकताच पेण तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून नियुक्ती झाली असून लवकरच तेथील कार्यभार सांभाळणार आहेत.मोहोपाडा येथील अव्वल कारकून नितिन फुलसिंग परदेशी यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.