Press "Enter" to skip to content

पनवेल येथे हातमाग यंत्रमाग कापड प्रदर्शनाचे उद्घाटन

सिटी बेल ∆ पनवेल ∆

रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील सुप्रसिद्ध भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे पनवेल येथे उद्घाटन करण्यात आले.

पनवेल महानगरपालिका इमारती समोरील गोखले सभागृहात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील व माजी नगरसेविका निता माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक अनिल भगत, रुचिता लोंढे, निता मंजुळे, प्रसाद म्हात्रे, संदीप पाटील, श्वेता म्हात्रे, पंडित काकू, क्षितिजा भिसे, प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन १६ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे.

हातमागावर विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जाचे असते त्यामुळे हातमाग कापड प्रदर्शनाचा पनवेल वासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रदर्शन प्रमुख पांडुरंग पोतन यांनी केले आहे.

हातमाग व विणकाम करून वापरण्यायोग्य तयार केलेले कापडामुळे कोणत्याही प्रकारचे त्वचारोग होत नाहीत हे कापड तयार करण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागत असल्यामुळे व विक्री दरापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्याने सध्या हातमाग कापडाची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये आमची नवीन पिढी येत नसल्याची खंत प्रदर्शनाचे प्रमुख पांडुरंग पोतन यांनी व्यक्त केली.

यावेळी गोवर्धन कोडम, योगेश पोतन, दीपक गुंडू, बाळू कोडम, रघू कोडम, निवास फरसा, मधुकर सुर्रत,लक्ष्मण उडता आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.