सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हिमालयातील माउंट नून हे शिखर, उंची 23,409 फुट सर करण्यासाठी मोहिम आयोजित केली आहे. हि मोहीम प्रि एव्हरेस्ट मोहीम म्हणून ओळखली जाते. या मोहिमेवर जाणाऱ्या विरांना कर्जत नगरपरिषदेतर्फे शुभेच्छा व ध्वजप्रदान करण्यात आला.
कर्जत मधील संतोष दगडे व टिम मधील इतर सदस्य संदिप मोकाशी, हेमंत जाधव,धनाजी जाधव हे भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हिमालयातील माउंट नून हे शिखर, उंची 23,409 फुट सर करण्यासाठी मोहिम आयोजित केली आहे. हि मोहीम प्रि एव्हरेस्ट मोहीम म्हणून ओळखली जाते. या मोहिम विरांना शुभेच्छा व ध्वजप्रदान कार्यक्रम नगरपरिषद कार्यालयात मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुवर्णा जोशीयांच्या हस्ते या टीमला आपल्या देशाचा तिरंगा ध्वज प्रदान करण्यात आला. यावेळी नगरसेवक बळवंत घुमरे, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, स्वच्छता निरीक्षक सुदाम म्हसे, रविंद्र लाड, तसेच नगरपरिषद मधील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेचे अध्यक्ष विकास चित्ते, उपाध्यक्ष महेंद्र कर्वे, तसेच शाळेचे लेझीम पथक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सववाचे औचित्य साधून सेंट्रल रेल्वे ऍडव्हेंचर स्पोर्ट क्लब तर्फे हिमालयातील माउंट नून हे शिखर सर करण्याची मोहीम आखली आहे. लडाख क्षेत्रात सुरू व्हॅलीत असलेले माउंट नून हे अतिशय कठीण व थंड असे ओळखले जाते.
समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची 23,409 फूट आहे . ही (Pre- Everest) प्री -एव्हरेस्ट मोहीम म्हणून ओळखली जाते. ह्या टीमचे पुढच्या वर्षीचे लक्ष हे जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे आहे. या मोहिमेचा कालावधी दि 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2022 असा आहे. या मोहिमेत नेता हेमंत जाधव, उपनेता संतोष दगडे, संदीप मोकाशी व धनाजी जाधव हे चौघे जण सहभागी होणार आहेत, आत्तापर्यंत या टीमने महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यावर मोहीमा आयोजीत करून नविन पिढीतील लोकांना ट्रेकिंग व किल्ल्याचे महत्व पटवून दिले आहे. तसेच ह्यांनी अनेक रेस्क्यू ऑपरेशनस करून अनेक लोंकाचे प्राण वाचवले आहेत तसेच आपत्कालीन भागात मदत कार्य करणे सायकलिंग मोहिमा आयोजित करून त्याचे महत्व लोकांना सांगणे अशी अनेक कामे ही टीम करत असते.
या आधी या टीमने हिमालयातील शिखर फ्रेंडशिप 5,287, देवतीब्बा 6,001,चंद्रभागा 13 – 6,264, सुदर्शन 6,507 मीटर, भागीरथी 2 – 6,512, याच बरोबर फ्लूटेड , केदारडोम, जोगिन अशी आत्तापर्यंत 14 शिखरांवर यशस्वीरीत्या चढाई केली आहे.








Be First to Comment