विश्वनिकेतनतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
कॉन्टेक्स्ट उपक्रमशील तथा
विश्वनिकेतनतर्फे करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाताळगंगा परिसरातील कुंभीवलीनजीकच्या प्रयोगशील विश्वनिकेतन तंत्रज्ञान संकुलातील
अभियांत्रिकी, वास्तुरचना तसेच डिझाईन महाविद्यालयांतर्फे डिप्लोमा
व बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी
नजीकच्या भविष्यातील करिअरच्या विविध संधी या संकल्पनेवर करिअर मार्गदर्शन शिबिर पार पडले.
यावेळी ख्यातनाम संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करीत पुढील दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.या कार्यक्रमास संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले,ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. संदीप इनामदार प्रमुख वक्ते म्हणून
उपस्थित होते.

या मेळाव्यात अच्युत गोडबोले यांचे भविष्यातील नोकरी व्यवसाय अन् जीवनशैली याविषयावर आयोजित करण्यात आले होते. डॉ. संदीप इनामदार यांचे नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती या विषयांवर मार्दर्शनपर
व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रागिणी मिश्रा यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वनिकेतन
संकुलाच्या विश्वस्त डॉ. अपर्णा भिरंगी यांनी केले.
यावेळी संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले व विश्वनिकेतन संकुलाचे उपाध्यक्ष डॉ. संदीप इनामदार, प्राचार्य डॉ. बी आर पाटील, प्राचार्या सुचेता मॅथ्यूज उपस्थित होते. तसेच डॉ. विकास गायकवाड, प्रा. ए बी पवार, प्रा. सुनीता जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना विश्वनिकेतन संकुलाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ अभियांत्रिकी शिक्षणतज्ज्ञ डॉ. संदीप इनामदार यांची असून सचिव सुनील बांगर, विश्वस्त डॉ.अपर्णा भिरंगी, प्राचार्य डॉ बी आर पाटील, प्राचार्या सुचेता मॅथ्यूज यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
नियोजनाची व संयोजनाची जबाबदारी उपप्राचार्य डॉ. एस वी कदम आणि दीप्ती सालोखे यांच्या सहकारीवर्गाने पार पाडली.








Be First to Comment