सिटी बेल ∆ श्रीवर्धन ∆ केतन माळवदे ∆
येथील गोखले महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्धघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांचे हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमात विज्ञान प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत पेन, चॉकलेट आणि पुष्प देऊन द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले.
या समारंभात महाविद्यालयात विज्ञान विभागामार्फत वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची व सोयी सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली त्यामध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळ, सांस्कृतिक व अशा अनेक विभागामार्फत होणाऱ्या उपक्रमांच्या माहितीसह विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
याप्रसंगी विज्ञान विभागाचे प्रा. वाल्मीक जोंधळे आणि प्रा. पंकज गमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्रीनिवास जोशी यांनी वैयक्तिक उदाहरणासह सद्याच्या स्पर्धेत शिक्षणाचे स्थान, महाविद्यालयाचे योगदान या विषयी माहिती दिली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. निलेश चव्हाण व डॉ. विलास व्हणकट्टे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाचा विद्यार्थी श्रेयस मोरे यांनी केले . कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीत व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराने करण्यात आली.








Be First to Comment