Press "Enter" to skip to content

२७ देशांतील खेळाडूनी घेतला सहभाग

सपोनि सुभाष पुजारी यांनी मि. एशिया स्पर्धेमध्ये जिंकले गोल्ड मेडल

सिटी बेल ∆ पनवेल ∆

५४ वी एशियन बॉडी बिल्डिंग व फिजीक स्पोर्टस् चॅम्पियनशिप २०२२ मालदीव या माफुशी बीच या ठिकाणी घेण्यात आली. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी महामार्ग पोलिस यांनी 80 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल मिळवून त्यांनी महाराष्ट्राची महाराष्ट्र पोलिस दलाची व भारताचीयाची मान अभिमानाने उंचावली आहे.

सुभाष पुजारी हे मि. आशिया स्पर्धेसाठी दररोज सहा तास
मिस्टर ऑलिम्पिया श्री सुनीत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली वन अबोव जिम नेरुळ या ठिकाणी सराव करीत होते.

या स्पर्धेसाठी त्यांना चेतन पाठारे वर्ल्ड बॉडीबिल्डींगचे सेक्रेटरी ,विक्रम रोठे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग लिगल अँडव्हायझर व प्रशांत आपटे साऊथ एशिया बॉडीबिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष , पत्नी रागिणी पुजारी, श्री आनंद गुप्ता चेअरमन व विवेक गुप्ता डायरेक्टर गमप्रो ड्रीलिंग कंपनी खालापूर. सुदर्शन खेडेकर डोंबिवली व मनोज बोचरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

यापूर्वी त्यांनी ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले होते.तसेच सलग दोनवेळा भारतश्री व महाराष्ट्र श्री हा किताब सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे.
तसेच ६ ते १२ डिसेंबर दरम्यान मालदीव फुकेत या ठिकाणी होणार्या मिस्टर वर्ल्ड स्पध्रेसाठी भारतीय संघातून त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय, जयजित सिंह –
पोलीस आयुक्त ठाणे, बिपिनकुमार सिंग – पोलिस आयुक्त नवी मुंबई, विनय कारगांवकर – अप्पर पोलिस महासंचालक, कुलवंतसिंग – अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक),
अनुपकुमार सिंह – अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य, डॅा .जय जाधव – अप्पर पोलीस आयुक्त नवी मुंबई, संजय जाधव अॅडिशनल पोलिस कमिशनर ठाणे,
आमदार रोहित पवार, परेश ठाकूर सभागृह नेता पनवेल महापालिका,
प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेता पनवेल महापालिका तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी मित्र सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.