Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त अनोखा उपक्रम

७५ कर्तबगार महिलांचा “मर्दांनी महाराष्ट्राची” पुरस्कार देऊन गौरव

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

भारताच्या स्वातंत्रप्राप्तीच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशभर “आझादी का अमृत महोत्सव” हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.त्याचाच भाग म्हणून SS सिनेव्हिजन यांच्या माध्यमातून आणि रसायनी मोहोपाडा मायभूमी असणारे सिने निर्माता दिग्दर्शक सिकंदर सय्यद यांच्या अभिनव कल्पनेतून तसेच आदम सय्यद, नीता कौल यांच्या अथक परिश्रमातून “मर्दानी महाराष्ट्राची” या राज्यस्तरीय पुरस्काराचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 75
कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव व सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.

प्रशासकीय, चित्रपट,शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले मान्यावर या सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते लेडी सिंगम ACP सुरेखा कपिले,  ACP R N राजे, पुणे मनपा साह्यक आयुक्त वैभव कडलक,डेप्युटी कमिश्नर एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलोपमेंट अनुपमा पवार, स्टेट लैंड रिकॉर्ड कमीशनर D L घोडके, मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसल, अभिनेत्री पूजा पवार, झेडा फेम पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम,संगीत दिगदर्शक हमायूँ कबीर,प्रसिद्ध हिंदी सिनेमा आणी सीरियलचे दिगदर्शक अरशद खान, दूरदर्शन व आकाशवाणीचे सहायक संचालक, इंद्रजीत बागल,मराठी सेंसर बोर्ड सदस्य महेश थोरवे या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या 75 कर्तबगार महिलांचा मेडल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य होमगार्ड उप संचालक कल्पना कपिले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.