सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
बीईंग गुड फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती वैजयंती ठाकूर आणि उपाध्यक्ष तुषार ठाकूर तसेच फाऊंडेशनचे सदस्य महेंद्र ठाकूर ,सदस्य प्रमोद जांभळे, भानूदास पाटील यांच्याहस्ते चाळीस विद्यार्थ्यांना छत्र्या आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले .
यावेळी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष तुषार ठाकूर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की , परिस्थिती किती ही आडवी आली, तरी शिक्षण हे परिस्थिती वर मात करून घ्यायला पाहिजे.तुम्ही उद्याचे या देशाचे आधारस्तंभ आहात असे आपल्या भाषणात म्हणाले.

बिईंग गुड फाउंडेशनच्या वतीने रसायनी पाताळगंगा परिसरातील जिल्हा परिषद शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या व दफ्तरांचे वाटप सुरू केले आहे.वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना याअगोदर वाटप करण्यात आले आहे.
यावेळी शालेय शिक्षक हसुराम मोतीराम पाटील, कल्याण भिकाजी चिलवन्त,विद्या संजय पाटील ,संगीता संजीव म्हेत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.








Be First to Comment