Press "Enter" to skip to content

एक पाऊल सक्षम आणी क्रियाशीलतेचे

पनवेल जिल्हा महिला कॉग्रेस आघाडीच्या वतीने महिला बचत गटाच्या सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिर

पनवेल जिल्हा काँग्रेस महिला आघाडीचा अत्यंत स्तुत्य उपक्रम

सिटी बेल ∆ पनवेल ∆

पनवेल जिल्हा महिला कॉग्रेस आघाडीच्या वतीने महिला बचत गटाच्या सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पनवेलच्या काँग्रेस भवन येथे शनिवार दिनांक 30 जुलै रोजी हे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी च्या अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांना मसाले, सरबत, जाम, गणपती बाप्पा साठी कंठी तसेच राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

उपस्थित शिबिरार्थींनी अत्यंत स्तुत्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल पनवेल शहर काँग्रेस महिला आघाडीचे मनःपूर्वक आभार मानले. तर काँग्रेस पनवेल जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष निर्मला ताई म्हात्रे यांनी महिला सक्षमीकरणासाठी फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षच हिरीरीने सहभागी होत असतो असे मत प्रदर्शित केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.