सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
रक्तदानासारखे पवित्र कार्य कोणतेही नाही. कारण रक्तदानामुळे मृत्युच्या दारात असलेल्या व्यक्तीला जीवनदान देता येते.योग्य वेळेत योग्य व्यक्तीला योग्य ते रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे. आणि हाच तुटवडा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त रक्तदान शिबीरे आयोजित करा या केलेल्या आवाहनानुसार अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने उरणमधील स्वर्गीय अश्विन रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 30 जुलै 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, देऊळवाडी,विमला तलाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकंदरीतच या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.या शिबिरात एकूण 140 जणांनी रक्तदान केले.

दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत, निरपेक्ष भावनेने सर्व तरुण, मित्र वर्ग एकत्र येउन या रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. एखाद्या गोर गरीब व्यक्तीला जीवनदान देण्याचे कार्य रक्तदान शिबिरा सारख्या कार्यक्रमातून अश्विन पाटील मित्र परिवारा तर्फे होत आहे. या कार्याचे तसेच मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, सर्वच पक्षाचे राजकीय कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन सदर उपक्रमांचे कौतुक केले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी तुषार पाटील,
गणेश पाटील,पप्पू सूर्यराव,शेखर पाटील,निलेश घरत,ऋषिकेश तांडेल,मयुरेश पाटील,सिद्धार्थ मसुरकर,वैभव तांडेल,राकेश भोईर, मिलिंद पाटील, दयाराम पाटील, रमेश पाटील यांच्यासह अश्विन पाटील मित्र परिवारच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment