स्थापत्य अभियांत्रिकी पदविका परिक्षेत भाविना शिंदे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
सिटी बेल ∆ पेण ∆
पेण तालुक्यातील जुई अब्बास हे एक खेडेगाव या गावातील भाविना चंद्रकांत शिंदे ही विद्यार्थिनी. घरची परिस्थिती बेताचीच , वडील एका खाजगी कंपनीत कामाला पण अगदीच तुटपुंज्या पगारावर, आई साधी गृहीणी. घरात अभ्यासासाठी मार्गदर्शन करणारा असा कुणीही नसताना तसेच गावातुन ये जा करण्यासाठी बसेस वा रिक्षा ची सुविधा नसताना तीने हे यश मिळवले आहे.
लहानपणापासूनच अभ्यासाची आवड , आणि जिद्द असल्यामुळे भाविनाने दहावी च्या बोर्डाच्या परीक्षेतही ९०.६० गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती . त्यानंतर तीने शासकिय तंत्रनिकेतन पेण येथे स्थापत्य अभियांत्रिकी कॉलेज मध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि तीथेही ती प्रत्येक वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून आपली यशाची परंपरा कायम ठेवली.
आता हे तीचे पदविका अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्षं आणि याही वर्षी तीने ८९ टक्के व पदवीका अभ्यासक्रमाचे एकुण तीनही वर्षाचे ओव्हरऑल ९०.३० एवढे गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले आहे. पदविका अभ्यास करत असतानाच तीची शेवटच्या वर्षी “एल ॲण्ड टी ” या नावाजलेल्या आयटी कंपनीत प्लेसमेंट झाली आहे.
यापुढे डिग्री करण्याची ईच्छा असुनही घरची परिस्थिती तीला डिग्रीचे शिक्षण घेण्याइतपत चांगली नसल्याने प्लेसमेंट झालेल्या ठिकाणी तीने नोकरी करण्याचे ठरविले आहे आणि कुटुबांला हातभार लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे.








Be First to Comment