Press "Enter" to skip to content

अबब… खारघरमध्ये आढळला ८ फुटी अजगर

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

खारघर सेक्टर-12 येथे खारघरचा राजा मंदिराजवळील रस्त्यावर अजगर आढळले परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ झाली होती.        

यावेळी पुनर्वसू फाउंडेशन या सर्पमित्र संस्थेचे सर्पमित्र मयुरेश उमेश नार्वेकर यांच्यासह त्याचे सहकारी सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांना घेऊन त्वरित घटना स्थळी जाण्यास रवाना झाले. घटनास्थळी पोहचेपर्यंत सापला रस्त्यावर जमलेल्या जमवाने घेराव घातलेला होता.

सर्पमित्रांनी पाहिले नागरिकांना सापापासून दूर केले, मात्र अष्टविनायक मोरे यांनी पाहणी केल्या लक्षात आले साप नसून की एक साधारण आठ ते नऊ फूट लांबीचा भारतीय अजगर आहे. ते अजगर रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत होते. आजूबाजूला लोकवस्ती तसेच रस्ता असल्यामुळे ते अजगर गाडी खाली येऊन मरण्याची शक्यता होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्रांनी त्वरित बचावकार्य सुरू केले.

काही वेळातच अजगरला सुरक्षितरित्या पकडण्यात पुनर्वसु फॉउंडेशन टीमला यश आले. त्यानंतर अजगरास जमावाद्वारे कोणत्या प्रकारची इजा पोचवण्यात आली आहे का ? कोठे लागले आहे का ? याची तपासणी करण्यात आली.

दरम्यान अजगरास कोणत्याही प्रकारची इजा झालेली आढळून आली नसल्याने अजगर सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अष्टविनायक व मयुरेश यांनी सापाविषय लोकांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागास घटनेची माहिती देऊन अजगरास सुखरूपरित्या जंगलात सोडून देण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.