सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, चौक शाखेचा दहावी सी.बी. एस.ई. बोर्डाचा निकाल यावर्षी सुद्धा शंभर टक्के लागला. सलग तीन वर्ष 100% निकालाची परंपरा श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने कायम राखली आहे.
कु. अमित साहू या विद्यार्थ्याने 94% गुण मिळवून शाळेत पहिला येण्याचा मान मिळवला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे साधू विश्वमंगलदासजी स्वामी, साधू ब्रह्मस्वरूपदासजी स्वामी, डायरेक्टर एल. मनोहर सर, मुख्याध्यापक डॉ. वासा शिवप्रकाश सर, सर्व समन्वयक, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment