Press "Enter" to skip to content

किल्ले सोंडाई च्या परिसरात शिवकार्य ट्रेकर्स वतीने वृक्षारोपण मोहीम संपन्न

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

जागतिक तापमान वाढ आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दरवर्षी प्रमाणे किल्ले सोंडाई गडपरिसरात रविवार दि.२४ जुलै २०२२ रोजी वृक्षारोपण मोहीम संपन्न झाली.

मानवी आयुष्यात झाडांचे महत्वपूर्ण योगदान आहे.झाडे आहेत म्हणून आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक असलेल्या प्राणवायू मिळतो.असं मतं वृक्षारोपण करतेवेळी शिवकार्य ट्रेकर्स चे संस्थापक रोहिदास ठोंबरे सरांनी व्यक्त केले.

शिवकार्य ट्रेकर्स टीम गेली पाच वर्षे सातत्याने किल्ले सोंडाई गडपरिसरात संवर्धनासाठी मोहिमा घेत आली आहे.आजसुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपून किल्ले सोंडाई परिसरात बांबू,गुलमोहर, आपटा, शिसव, निलगिरी आदी प्रकारची झाडे लावण्यात आली.

सदर वृक्षारोपण मोहीम शिवकार्य ट्रेकर्स खालापूर विभाग वतीने आणि वनविभाग अलिबाग,वनपरिक्षेत्र खालापूर कर्जत तसेच ग्रामपंचायत बोरगाव व सोंडेवाडी ग्रामस्थ वतीने घेण्यात आली.या मोहिमेत शिवकार्य चे संस्थापक रोहिदास ठोंबरे,बोरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पप्पू झोरे,वनपाल रमेश झोरे,महेश दुर्गे,प्रसाद जाधव, जितेंद्र कदम,मंदार उतेकर,आकाश गोडीवले,रमेश शिंदे,विकास मालुसरे,मनीष आमकर,प्रशांत शेलार व सागर गंभीरराव हे दुर्गसेवक सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.