Press "Enter" to skip to content

नवीन पनवेलमध्ये 24 जुलैला ध्यानसाधना कार्यशाळा

सिटी बेल ∆ नवीन पनवेल ∆ रत्नाकर पाटील ∆

श्री धुतपापेश्वर आयुर्वेद ट्रस्ट संचालित इन्स्टिटयूट आॕफ योग अँन्ड आयुर्वेद व आरोग्य सेवा समिती पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ध्यानसाधना कार्यशाळेचे आयोजन रविवार दि. २४ जूलै २०२२ रोजी सकाळी ७ वाजता नविन पनवेल येथील के.आ. बांठिया विद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी नवी मुंबईचे योगशिक्षक व निसर्गोपचार तज्ञ तथा योगविद्या निकेतन मुंबईचे उपपिठाधिकारी दुर्गादास सावंत उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना योगासंबंधी बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यशाळा विनाशुल्क असून येणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, तरी तमाम नागरिकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून सदर उपक्रम यशस्वी करावे, असे आवाहन आरोग्य सेवा समितीच्या कार्यक्रम प्रमुख गीता गुप्ता यांनी केले आहे. यावेळी आरोग्य सेवा समितीचे अध्यक्ष मधुसूदन जोशी, उपाध्यक्ष सुरेश जाधव, योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.