माजगांव आदिवासी वाड्यामध्ये पेव्हर ब्लॉक पावडर टाकून – ग्रामस्थांना दिलासा
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रत्येक गावामध्ये विविध बदल घडले गेले असून घरासमोरील अंगण मात्र ते सुद्धा पेव्हर ब्लॉक चे झाले आहे.त्यातच पावसाचे दिवस असल्यामुळे या ब्लॉक वर शेवाळी निर्माण झाल्यामुळे वाहन तसेच माणसे घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.मात्र कुणालाही दुखापत होऊ नये यासाठी ग्रुप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव ग्रामसेवक संदिप धारणे,उप सरपंच नितिन महाब्दि,सदस्य,सदस्या यांच्या माध्यमातून पेव्हर ब्लॉक वर चुना टाकण्याचे काम प्रगती पथावर सुरु आहे.
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव या परिसरात गावे तसेच आदिवासी वाड्यामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्यामुळे या पासून कुणालाही त्रास होऊ नये.यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.पावसाळ्यात घरातील सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे पेव्हर ब्लॉक वरून वाहन तसेच नागरिकांचा पाय घसरून पाडण्याचे प्रमाण वाढले होते.नागरिकांच्या सुरक्षेते संदर्भात एक पाऊल पुढे घेऊन ग्रूप ग्राम पंचायत माजगांव ने या परिसरातील जोडणा-या गावातील शेकडो घरे आदिवासी वाड्या अशा अनेक ठिकाणी चुना पावडर टाकण्याचे काम सुरु केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ही चुना टाकण्याचे काम केले जात असताना यावर्षी सुद्धा काम सुरु आहे गावातील कामे शोधून ती विकास कामे करण्यास जोर देत आहे.गावामध्ये निर्माण होणार-या समस्यां तसेच विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम सध्या सुरु आहे.या पंचायतीला गावे आणि आदिवासी वाड्या जोडल्या असून बहुतेक वाड्या मध्ये पेव्हर ब्लॉक झाले आहे.मात्र त्याचा त्रास पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ यांना सहन करावा लागत आहे.मात्र त्यांना होणारा त्रास नियंत्रणात यावा यासाठी विविध उपाय योजना सुरु असल्याचे ग्रामपंचायत म्हणणे आहे.
पावसाळ्यात पेव्हर ब्लॉकवर शेवाळी निर्माण झाल्यामुळे अपघाताची समस्यां गंभीर बनत आहे.ग्रामस्थांच्या सुरक्षेतेची काळजी घेत ग्राम पंचायतीच्या मार्फत पेव्हर ब्लॅक वर पावडर टाकण्याचे काम सुरु आहे. . ( ग्रूप ग्राम पंचायत माजगांव, सरपंच – गोपीनाथ जाधव )








Be First to Comment