Press "Enter" to skip to content

माथेरानच्या एमटीङीसी मध्ये झाली आढावा बैठक

माथेरान मध्ये ई- रिक्षा सुरू होण्याच्या हालचालींना वेग

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला असून त्याबाबाबत माथेरान मध्ये नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली आहे.

सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालाचे पालन करून सहनियंत्र समितीचे सचिव जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सुचने नुसार उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली माथेरान मध्ये एमटीङीसी येथे ई-रिक्षा संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीत ई रिक्षाची निवड करण्यापुर्वी प्रत्यक्ष चाचणी घेण्याच्या सुचना करून त्या साठी नगरपालिकेला तांत्रिक बाबतीत मार्गदर्शन, सल्ला आणि शिफारस करण्यासाठी एक समिती गठीत केली असून या संदर्भात एक बैठक उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पङली.

या बैठकीत लवकर ई-रिक्षा बाबत चाचणी घेण्याचे ठरले असून तांत्रिक बाबींची पडताळणी परिवहन विभागाकडून केली जाणार आहे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस विभागची मदत घेतली जाणार आहे, या करता ब-याच चांगल्या सुचना नगरपालिकेकडे प्राप्त झाल्याची माहीती माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली, तसेच माथेरानच्या शहरासाठी आणि भविष्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णयामधील एक टप्पा प्रत्यक्ष चाचणीच्या दिवशी सुरू होणार आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तसेच सर्व प्रशासकीय बाबींचा पूर्तता सहनियंत्र समिती तसेच सर्व सदस्य माथेरान गिरीस्थान नगरपालिका करत असल्याचे मुख्याधिकारी भणगे यांनी स्पष्ट केले. माथेरानच्या दृष्टीने किती तरी वर्ष प्रलंबित प्रश्नावर तोङगा निघणार आहे, देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असून हा दिवस सगळी कङे अमृत महोत्सव साजरा होत असतांना त्याच वेळी ई-रिक्षा चालू होणे म्हणजे माथेरानच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांती म्हणावी लागेल, ज्या दिवशी ई-रिक्षा माथेरानच्या रस्त्यावरून धावेल तो दिवस माथेरान करिता सुवर्णा अक्षराने लिहिण्या सारखा असेल.

या बैठकीला पनवेल आरटीओ, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे,आरटीओ टेक्निकल अधिकारी, माथेरानचे एपीआय शेखर लव्हे, वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम, माथेरानचे अधिक्षक दिक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या सह सर्व अधिकारी उपस्थित होते.

ई-रिक्षाच्या चाचणी बाबत बोलताना याचिकाकर्ते सुनील शिंदे म्हणाले की या करता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच मुख्याधिकारी सुरेखा भणगे व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मा सुप्रीम कोर्टाच्या आदेशा नुसार निर्णय घेत असल्याने लवकरच माथेरानकरांचे ई- रिक्षाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.