स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत तिरंगा उपक्रम माथेरान नगरपालिका राबणार
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
केंद शासना मार्फत” हर घर तिरंगा” अभियान राबवण्यात येणार असून ते माथेरान मध्ये जिल्हाधिकारी ङाॅ.महेंद्र कल्याणकर यांच्या सुचने नुसार राबविण्यात येणार असल्याची माहिती माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली.
माथेरान येथील बाळा साहेब ठाकरे सभागृहातबैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी माथेरानचे अधिक्षक दिक्षांत देशपांडे, माथेरानचे एपीआय शेखर लव्हे, वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम तसेच माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, याच्या सह माजी नगरसेवक तसेच नगरपालिकेचे कर्मचारी, नागरीक उपस्थित होते

भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्याच्या सृती तेवत रहाव्यात तसेच संग्रामातिल स्वतंत्र अज्ञात नायक/क्रान्तिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटणांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्या साठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात कायम राहावी या उद्देशातून इतिहासाचे दैदीप्यमान अभिमान पुर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 11ऑगस्ट ते दि.17ऑगस्ट या कालावधीत केंद सूचनांच्या मार्गदर्शन सुचने नुसार “हर घर तिरंगा”देशभर हा उपक्रम राबविण्यात येणार असून तो माथेरान नगरपालिकेत देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भणगे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत दिली.
या वेळी नागरिकांनी याबाबत काही सुचना देखील केल्या या सूचनांचे पालन करून तसेच शासकीय स्तरातून येणा-या सूचनांचे पालन करून चांगला उपक्रम माथेरान गिरीस्थान करेल असही मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी बैठकी स्पष्ट केले.







Be First to Comment