Press "Enter" to skip to content

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचे वतीने रामेश्वर महाराज नरे “गुणिजनरत्न जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचे वतीने रामेश्वर महाराज नरे यांना राज्यस्तरीय गुणिजनरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुबई यांचे वतीने सांस्कृतिक सभागृह, मुंबई शहर येथे सौ. मनिष कदम (संमेलन, समन्वयक) व ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर (सुप्रसिध्द किर्तनकार, कवी, पत्रकार) यांच्या हस्ते रामेश्वर महाराज से यांना राज्यस्तरीय गुणिजनरत्न जीवनगौरव पुरस्कार-२०२० हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

गुणिजनाची समरसता व गुणवत्तापूर्ण कार्यातूनच आपला भारत देश जागतिक महासत्ता म्हणून उदयास येईल आणि जात, धर्म, पंथ, पक्ष व प्रांत निरपेक्ष गुणिजनांच्या समरसतेतून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला अधिक चालना मिळेल यावर दृढ विश्वास असलेल्या विविध क्षेत्री गुणिजनाना हा पुरस्कार दिला जातो.

रामेश्वर महाराज नरे हे आदिवासी समाज बांधवामध्ये जात, धर्म, पंथ, पक्ष असा भेदभाव न करता अविरत मेहनत घेत आहे, त्यांच्या कार्याची दखल घेवून हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत रामेश्वर महाराज नरे यांचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.