सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
मागच्या अनेक वर्षांपासून महावितरणांच्या समस्या सोडविण्यासाठी एमएसईबीचे कॉन्ट्रॅक्टर दिवस रात्र मेहनत घेत आहेत.मात्र कित्येक महिने होऊन गेले तरी महावितरण संबंधित कॉन्ट्रॅक्टरांची थकलेली बिल अदा करीत नसून यासह अनेक विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पेण येथील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये महावितरणाने पॅनेलमेंट टेंडर २०१९ मध्ये सर्व प्रकारच्या टेंडरला कामासंबंधीचे मटेरियल काॅस्ट डाटा व लेबर शेडूल रेट यामध्ये तीन वर्षापासून कोणतीही वाढ केली नसून यासह शासनाच्या जीआर नुसार ३१ मार्च २०२२ रोजी प्रिव्हेन्टीव्ह मेंटेनन्स ब्रेकडाऊन मेंटेनन्स व एनसीसीच्या टेंडरची मुदत संपलेली असताना सुद्धा आपल्याकडून तीन महिन्यासाठी देण्यात आले आहे. यात महावितरणाने संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी चर्चा करणे गरजेचे होते.मात्र यात कॉन्ट्रॅक्टर ना धमकवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो तात्काळ थांबवा यासह आमच्या अनेक मागण्या अजून प्रलंबित आहेत.

रायगड जिल्ह्यातील असणारे कॉन्ट्रॅक्टर महावितरणाच्या अडचणी सोडवण्यासाठी दिवस-रात्र काम करीत असताना सुद्धा वरिष्ठ कार्यालयामार्फत मागील अनेक महिने पेमेंट अदा केले जात नाहीत याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाला निवेदन देऊनही याकडे संबंधित कार्यालय डोळेझाक करीत असल्याने नाईलाजास्व रायगड जिल्हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणाने सदर कॉन्ट्रॅक्टरांच्या असणा-या सर्व मागण्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी केली.
या धरणे आंदोलनाला कार्याध्यक्ष राजेश सानप उपाध्यक्ष धनंजय पाटील, धुमाळ, शिवराम जंगम, अभिजीत जाधव, सचिव भालचंद्र जोशी, खजिनदार दिनेश पाटील, सल्लागार किरण बोरसे आदी उपस्थित होते.यावेळी महावितरणाचे अधीक्षक अभियंता आय.ए. मुलाणी यांनी सदर धरणे आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन सदर निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.







Be First to Comment