निर्लज्ज एमआयडीसी प्रशासनाला जनाची आणि मनाची देखील लाज उरली नाही : प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया
सिटी बेल ∆ पनवेल ∆
तळोजा एमआयडीसी येथून अंबरनाथ डोंबिवली कडे जाणाऱ्या रोडवरील आयजीपीएल चौक ते नागझरी गाव या दरम्यानचे रोडवरील 1200 मीटर रोड अत्यंत खराब असून चार ते पाच ठिकाणी दीड ते दोन फूट खड्डे पडले होते. ते खड्डे भरण्याबाबत ट्राफिक पोलीसांनी वारंवार एमआयडीसी प्रशासनाकडे पाठपुरावा केला परंतु सदर रस्त्याबाबत स्थानिक शेतकरी व एमआयडीसी यांच्यात नुकसान भरपाई देण्यावरून मतभेद असल्याने सदर स्थानिक शेतकरी रस्ता दुरुस्तीस विरोध करतात असे कारण पुढे करून एमआयडीसी प्रशासनाकडे हात वर केले.

गेले 8 ते 10 दिवसापासून सतत चालू असलेल्या पावसाने पाणी साचल्यामुळे अनेक वेळा येथे वाहतूक कोंडी झाली. सदर वेळी खड्ड्यात कोणीही वाहन चालक गाडी घालत नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत असे. तेव्हा सात ते आठ ट्राफिक पोलीस कर्मचारी दोनशे मीटरच्या अंतरावर उभे राहून रोड दुभाजकाचे काम करून वाहनचालकांना पुढे जाण्यास मार्गदर्शन करीत असत . सदर अंमलदार सतत पाण्यात उभे राहून कर्तव्य करत असल्यामुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना पायाला चिखल्या पडण्याचे विकार निर्माण झाले.

अखेर आज प्रापंचिक पोलीसांनी निर्लज्ज एमआयडीसी प्रशासनाची वाट न पाहता वाहतूक शाखेच्या स्तरावर साधनसामग्री उपलब्ध करून सदर पोलीस अंमलदारांनी तीन ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम केले. या कामामुळे दररोज आपला जीव मुठीत घेऊन जाणारे वाहनचालक यांनी समाधान मानून या वाहतूक पोलिसांचे आभार मानले.







Be First to Comment