Press "Enter" to skip to content

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना

डायलिसिस कक्षामधील शौचालयाचे कोसळले पीओपी

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

रायगड जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील शौचालयाचे पीओपी कोसळले सुदैवाने त्याठिकाणी कोणीही नसल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डायलिसिस असणाऱ्या कक्षात सकाळी शौचालयातील पीओपी हा अचानक कोसळल्याने त्या कक्षातील अधिकारी कर्मचारी यांची एकच धावपळ उडाली.

शौचालयतील पीओपी ज्यावेळी पडला तेव्हा आवाज झाला असल्याने कक्षातील अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेले.मात्र शौचालयाचा दरवाजा उघडत नसल्याने प्रथम वाटले की आत मध्ये रुग्ण आहे का याची खात्री केली असता त्याठिकाणी कोणीही नसल्याचे पाहून हायसे वाटले.

याबाबत तेथील कार्यरत अधिपरिचरिका यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर शौचालयमधील पीओपी हा आज सकाळी पडला आहे.त्यावेळी कोणीही रुग्ण नव्हते. पडलेल्या पीओपी बाबत वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत कळविले आहे.

डायलेशीस विभागात शौचालयात ज्याप्रमाणे पीओपी पडला आहे त्या ठिकाणी सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.मात्र डायलेशीस विभागात पण पीओपीची अशीच अवस्था असल्याने त्या ठिकाणी पीओपी पडला तर अनुचित प्रकार घडू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डायलेशीस रुग्णांना सद्स्यस्थित शौचालय चा पीओपी पडल्याने रुग्णांची मोठ्या प्रकरणात गैरसोय होत आहे. दोन दिवसांपूर्वी डायलेशीस विभागाच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा डायलेशीस कक्षाच्या वर असणाऱ्या खिडकीचा स्लॅब कोसळून तो एसीवर पडला असल्याने कक्षातील दोन एसी बंद पडली आहे.डायलेशीस विभाग हा वातानुकूलित असणे गरजेचे आहे.सद्यस्थितीत हा विभाग फक्त एका वातानुकूलित यंत्रणेवर आहे.

याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक प्रमोद गवई यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, “सकाळी पीओपी पडला आहे.त्याबाबत संबंधित कक्षाचे कर्मचारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.लवकरात लवकर शौचालयाचे काम तसेच इतर काही आवश्यक कामे आहेत ती त्वरित करून घेतली जातील.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.