सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
अभिनव ज्ञान मंदिर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कर्जत येथे ‘गुरुपौर्णिमा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. प्रविण घोडविंदे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तसेच कार्यक्रमाचे उद्धाटन सरस्वती मूर्तीस दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी दिक्षा क्षिरसाठ हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरूंबद्दल आपली कृतज्ञता, गुरूंचे महत्व आपल्या गीतामधून व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी दीप्ती पाटील, मनिष कोकणे, देवयानी पाटील, सौरभ देशमुख, रोहिणी रेड्डी, आदित्य कोडगिरे यांनी गुरुंबद्दल आपले आदर युक्त भाषण व्यक्त केले.
महाविद्यालयातील प्रा. सुजित देशमुख, प्रा. गणेश पाटील, प्रा. प्रशांत दळवी यांनी आजच्या पिढीतील गुरूंची संकल्पना, गुरूंचे स्थान याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. मा.प्राचार्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व महाविद्यालयाने एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण घोदविंदे यांनी गुरुचे आपल्या जीवनातील स्थान, शिष्य कसा घडत असतो आणि सर्वोच्च शिखर कसे गाठू शकतो, तसेच आपल्या जीवनाला गुरूंद्वारे कलाटणी कशी मिळू शकते यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार सुयोग झगडे या विद्यार्थ्याने केले.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शिल्पा भुसारी यांनी केले.
यावेळी अभिनव ज्ञान मंदिर महाविद्यालयाचे अध्यक्ष गणेश वैद्य व सर्व कार्यकारणी यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. व या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.







Be First to Comment