सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
नागोठणे येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान महाविद्यालय व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ५५ व्या युवा महोत्सवानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग समन्वयक मा. श्री. निलेश सावे यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदेश गुरव हे होते. या कार्यशाळेत युवा महोत्सवामध्ये सादरीकरण कसे करावे या विषयावर तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. सुगम संगीत, समुह गीत, शास्त्रीय गायन, पारंपरिक नृत्य, कथ्थक, नाटक, अभंग, गझल, भक्ती गीत इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम कसे सादर करावे याचे प्रात्यक्षिक मुंबई विद्यापीठाच्या तज्ञ विद्यार्थ्यां द्वारे दाखविले गेले.
सदर कार्यशाळेत रायगड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन सांस्कृतिक विभाग समन्वयक व विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी रायगड जिल्हा सांस्कृतिक समन्वयक डॉ. जयेश म्हात्रे, डॉ. पराग कारूळेकर व डॉ. दिपक गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. संजय दत्ता पाटील, कार्यवाह हमा. श्री शिद्धार्थ संजय पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. मनोहर शिरसाठ- सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनोहर शिरसाठ, डॉ. दिनेश भगत, डॉ. सतिष पाटील, प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, डॉ. विलास जाधवर, डॉ. विजय चव्हाण, प्रा. जयेश पाटील, डॉ. विकास शिंदे डॉ. सौ. स्मिता चौधरी, प्रा. हेमंत जाधव, प्रा. निलम महाले सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.







Be First to Comment