Press "Enter" to skip to content

सिटी बेल च्या दणक्याने उजळले पथदिवे

नागोठण्यातील रस्त्यावरील अंधाराचे साम्राज्य संपुष्टात : नागरीकांना दिलासा

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆

संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील ग्रामीण भागात महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याने नागोठणे येथील ग्रामीण भागामध्ये रस्त्यावरील पोलावरचे पथदिवे बंद अवस्थेत होते. परंतु आता ते पथदिवे पुन्हा उजळल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

याबाबतची बातमी काही दिवसांपूर्वी सिटी बेल या अग्रगण्य न्युज पोर्टल मध्ये नागोठणे प्रतिनिधी याकूब सय्यद यांनी प्रसिद्धी केली होती आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील सीईओ यांना मोबाईल द्वारे पथदिवे बंद अवस्थेत असलेले संदर्भात प्रश्न विचारणा केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्या प्रश्नांना उत्तर देताना असे सांगितले की, ग्रामपंचायतीने घरांचे कर वाढवायला पाहिजे तसेच ते कर वसूल करायला पाहिजे. शासनामार्फत आम्ही अंश अनुदान शंभर टक्के येणारा अनुदान संबंधितांना देतो नुसते स्थानिक स्वराज्य संस्थांनी आर.सी.सी.चे रस्ते घेवून काय उपयोग असे देखील आमच्या प्रतिनिधी जवळ मोबाईल द्वारे पाटील यांनी सांगितले.

वीज पुरवठा पथदिवे पूर्वावस्थेत करण्यासाठी शासनामार्फत आलेली रक्कम ही जिल्हा परिषद अलिबाग कडून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी वेळेनुसार जमा केली नसल्याने रक्कम जमा करण्यास विलंब लागल्या कारणाने रस्त्यावरील पथदिवेचे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला बंद करण्यास भाग पडले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीला कोणती सूचना न देता थेट रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पथदिवे विज पुरवठा बंद केली असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीला पूर्वीच सूचना देणे हे गरजेचे होते तसे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने केले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे किंवा सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांचा कोणताही दोष नसून ग्रामपंचायतींना लोकांनी ग्राही व वेठीस धरू नये असे वारंवार ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामविकास अधिकारी बोलत होते तरी देखील नागरिकांना त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु सिटी बेल न्युज पोर्टल मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद यांचे अध्यक्ष सोमनाथ ओझर्डे यांनी 05/07/ 2022 / अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पत्रावर रायगड जिल्हा अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना विनंती केली की, जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणत्याही ग्रामपंचायतींना कोणते आदेश न देता किंवा सूचना न देता रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील रस्त्यावरील पोलावरची विज पुरवठा पथदिवे बंद करण्यात आले. परंतु सध्या पावसाळा सुरू असल्याने ग्रामीण भागातल्या लोकांना विषारी सर्प विंचू सारखे जनावरांचा सामना करत जीवन जगण्यास भाग पडत आहे. शासनाचा जीआर व नियमानुसार 29 जून 2022 ते 2023 वर्षातील पथदिवे बिल जिल्हा परिषद कडे 100% अनुदान स्वरूपात जमा केला जातो परंतु महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला सध्या ते बिल अदा न केल्याने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कोणतीही पूर्व कल्पना व सूचना न देता ग्रामीण भागातील विज पुरवठा बंद करण्यात आला. ही बाब अतिशय चिंताजनक आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातल्या नागरिकांना रस्त्यावरील पोलांवर पथदिवे बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना अंधेरात रात्रीचे वेळी खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी कृपया करून जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित करून बंद अवस्थेत असलेले रस्त्यावरचे पथ दिवे प्रश्न निकाली काढावा.

असे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या लेखी पत्रान्वये रायगड जिल्हा अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना अध्यक्ष सोमनाथ ओझर्डे यांनी माहिती पुरवल्या नंतर त्वरित जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे रायगड जिल्ह्याचे प्रमुख यांना सूचना दिल्या की सध्या पावसाला जोरात सुरू आहे ग्रामीण भागातले नागरिकांना अंधेरा मुळे कोणत्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडित न करता ते सुरळीत चालू करावे तसेच शासनाकडून रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा झालेली आहे काही दिवसातच ती रक्कम महाराष्ट्र राज्य वीज पुरवठा वितरण कंपनीकडे जमा केली जाईल असे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले असता रायगड जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागातले रस्त्यावरील पथदिवे वीजपुरवठा सुरळीत अवस्थेत करण्यात आले आणि ग्रामीण भागातले रस्त्यावरील असलेले पोलावरचे पथदिवे अखेर प्रकाशित झाले त्यामुळे जनतेने सुटकेचा श्वास घेतला आहे.

सिटी बेल व अखिल भारतीय सरपंच परिषदचे प्रयत्नाला यश प्राप्त झाल्याने रायगड जिल्ह्यातील जनता त्यांचे जाहीर आभार मानत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.