# सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) #
मुंबई-गोवा महामार्गावरील खांब जवळील सुकेली खिंडीच्या पायथ्याशी मोकाट गुरांचे रस्ता रोको केल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.या महामार्गावर मोठया प्रमाणात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असुन याकडे संबंधित व्यक्तीकडुन लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात आपली शेती मुंबई-दिल्ली येथील धनीकांना विकल्या असुन ६ ते ७ वर्षात जमिनी विकण्याचा व्यवसाय जोमाने झाला आहे.यातच आपल्याकडील शेती विकणाऱ्या शेतकऱ्यांची बिनकामी गुरे मोकाट सोडलेली आहेत.तर जमिनी विकत घेतलेल्या मालकांनी सर्व शेती भोवती तारेचे कुंपण घातले आहे.त्यामुळे शेती विकलेल्या शेतकऱ्यांची गुरे चरण्यासाठी जागा राहिलेली नसल्याने शेतकऱ्यांनी ही गुरे मोकाट सोडली असुन ही गुरे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध उभे राहुन जणु रास्ता रोको केल्याचे दिसुन येत आहे.
या मोकाट गुरांनमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला.यातच गुरांना अपघात झाला तर शेतकरी भरपाई मिळण्यासाठी धावत येतो.परंतु गुरांच्या मुळे वाहना चालक व प्रवाशांचा अपघात झाला तर शेतकरी जवळ येत नाही.अशा मोकाट गुरांचा बंदोबस्त संबंधितनकडून करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडुन केली जात आहे.
Be First to Comment