Press "Enter" to skip to content

रसायनीतील तरुणांकडून श्रमदान

रस्त्यावरील खड्डे बुजवून श्रमदान करीत खड्ड्यांची डागडुजी

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

दांड-रसायनी रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या रस्त्यावरून येण्या जाणाऱ्या वाहनांतून नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे.यातच वाहनांचे स्पेअर पार्ट निकामी होणे, नागरिकांना कंबर व पाठदुखी त्रास होणे,दररोज छोटे-मोठे अपघात होणे आदी समस्या सुरुच आहेत.दांड -रसायनी रस्त्यावरील मोहोपाडा हे मुख्य स्थळ असल्याने येथील रस्त्यालाच भलेमोठे खड्डे पडल्याने शाळेतील मुलांना- महिलांना येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

रस्त्याच्या या झालेल्या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.यासाठी पत्रकार राकेश खराडे यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेत तसेच रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी लक्ष वेधले.त्यांनी केदार शिंदे व इतर लोकप्रतिनीधींशी संवाद साधला.

यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या केदार शिंदे व त्याचे मित्रपरिवार यांच्याशी संवाद साधून परिस्थिती समजावली.यावेळी सदरील नागरिकांनी वैयक्तिक दखल घेत व सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते प्रसाद बडगुजर, केदार शिंदे या युवकांनी पुढाकार घेऊन मोहोपाडा प्रवेशद्वार,बॅक ऑफ इंडिया समोरील भळामोठा खड्डा,पोस्ट कार्यालयासमोरील खड्डे बुजवून श्रमदान करीत खड्ड्यांची डागडुजी केली.

या रस्त्याचे खंडार झालेले खड्डे बुजवण्यात आले तसेच यावेळी कोणत्याही वाहन चालकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये याची दक्षता वाहतूक पोलीस सताने, पाटील, देशमुख व युवकांच्या मार्फत घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते
मनीष पाटील ,सोहम शिंदे ,अक्षय बाळाराम पाटील, उद्योजक विशाल मुरकुटे, गणेश पाटील, अलंकार भोईर , अजित पाटील, कौशल खाने ,
वडगाव ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.