विमलाताई पारनेरकर विद्यामंदिर वाशिवली शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली पायी दिंडी
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विमलाताई पारनेरकर सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यामंदिर वाशिवली या शाळेत शिकत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढून अनेकांचे लक्ष वेधून घेतले.कारण वारकरी ज्या भुमीकेतून पंढरपूर ला जात असतो. तशीच वस्तू स्थिती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निर्माण केली होती. मुखामध्ये हरीचे अभंग आणि टाळ मृदुंगाच्या गजरात हि दिंडी मोठ्या आनंदाने वाशिवली येथील असलेल्या विठोबा -रखुमाईच्या मंदिरात विसावली.
या दिंडी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची विठूरायाबद्दल विश्वास आणि श्रद्धा पाहून जमलेले नागरिक थक्क झाले होते.विविध प्रकारची वेशभूषा आणि डोक्यावरती तुळस आणि मस्तकी पांडुरंगाचा बुक्का जणू हि विद्यार्थी वारकरी आहे कि काय ?आणि हे पंढरपूरला निघाली आहे कि काय ? असा भास येथून जाणा-या वाटसरू व्यक्त करीत होते.

त्यांच्या विचारांची संकल्पना आणि या भगवंताच्या बद्दल असलेली श्रद्धा जे मोठ्या व्यक्तींना जमणार नाही.ते सहज आणि शिस्त बद्धतिने या शाळकरी मुलांनी करून दाखिविले.आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नसलो तरी त्याच्या या नामच्या उच्चाराने आणि वारकरी सारखी दिंडी काढून मनाला एक प्रकारचे समाधान या विद्यार्थाना मिळत आहे.असे मत दिंडी आयोजक विमलाताई पारनेरकर सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यामंदिर वाशिवली चे संस्थाध्यक्ष तुळशीदास पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापिका – मीनाक्षी रणदिवे, सहशिक्षक कल्पना गव्हाणे,वारगुडे सर, संजीवनी म्हात्रे या शिक्षकांनी पहिली ते चौथी पायी दिंडी चे आयोजन केले होते. शांताराम पारींगे (पालक) यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.







Be First to Comment