प्रभुदास भोईर यांच्या दणक्याने सिडको प्रशासन वठणीवर
सिटी बेल ∆ पनवेल ∆
महाराष्ट्र माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सिडको प्रशासन वठणीवर आले आहे. बुधवार दिनांक 13 जुलै रोजी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी तुटलेल्या रस्त्याचे सर्वेक्षण करून तातडीने दुरुस्ती सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
सिडकोच्या कळंबोली रोडचे कार्यकारी अभियंता सुहास बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन खिडूक पाडा रस्त्याचे सर्वेक्षण केले आहे. सध्या रस्त्याची करणार असल्याचे सिडकोवादी कारणे सांगितले तसेच पावसाळ्यानंतर निविदा प्रक्रिया करून संपूर्णपणे नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे
याबाबत अधिक माहिती देताना प्रभुदास भोईर म्हणाले की, येथील ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासामुळे आम्ही सिडकोला निर्वाणीचा इशारा दिला होता. सिडको प्रशासनाने आमच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत तातडीने काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तूर्तास रस्त्याची तात्पुरती होणार असली तरी देखील पावसाळ्यानंतर हा रस्ता संपूर्णपणे नवीन तयार करण्यात येणार आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली जरी या कामाला यश येत असले तरीदेखील येथील समस्या सोडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश भोईर,सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड, प्रभाकर उलवेकर, दीपक गोंधळी, देवदास भोईर यांनी अथक परिश्रम घेत पाठपुरावा केला आहे.







Be First to Comment