अतिवृष्टी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
गेले काही दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमध्ये पेरलेल्या राबांचे, पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून राब पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, तरी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे, परंतु त्याआधी झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे असून त्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित आदेश द्यावेत जेणेकरून पंचनामे झाल्यावर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता येईल असे पत्र कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी तहसील कार्यालय व कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे दिले आहे व पत्राद्वारे मागणी केली आहे.
Be First to Comment