Press "Enter" to skip to content

हेमंत म्हात्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

तंटामुक्ती अध्यक्ष नविन शेवा व मनसे शाखाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील नविन शेवा गावातील प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप केले . तसेच शिक्षकांना व नवीन शेवा ग्रामपंचायत कर्मचारी यांना छत्री वाटप करून हेमंत म्हात्रे यांनी आपला वाढदिवस साजरा केला.

युवा नेतृत्व म्हणून हेमंत म्हात्रे यांच्याकडे पाहिले जाते. सर्व राजकीय पक्षाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. ते राजकारण पेक्षा समाजकारण जास्त करतात. सामाजिक कार्य जास्त करतात.गावातील तंटे भांडण ते निपक्षपातीपणाने सोडवितात.मनसेचे ते एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ते आहेत.त्यामुळे त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग उरण मध्ये आहे. दरवर्षी ते आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात.वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भेटून तर अनेकांनी सोशल मिडीया द्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.