Press "Enter" to skip to content

शेतकरी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संस्था चावणे (रजि.) यांच्यावतीने चावणे येथील माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी दहावी व बारावी परिक्षेत प्रथम ,द्वितीय ,तृतीया असे क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा चावणे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक रमेश सातपुते, मुंबई प्राध्यापक व माजी सैनिक कमांडर कुंदन शिंदे, हायस्कूलचे प्राध्यापक पद्माकर हिंगे,शालेय शिक्षक वृंदासह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मारुती राम पाटील, सरचिटणीस प्रकाश धाऊ सोनावळे , उपाध्यक्ष कृष्णा पाटील,खजिनदार भरत पाटील, सहखजिनदार रघुनाथ जूमारे, सचिव मधुकर सोनावणे, ऑडिटर हर्षद सोनवणे, ऑडिटर हर्षद सावंत सचिव अरुण पवार, सदस्य संदीप लहू पाटील, रोशन मते ,नामदेव पाटील तसेच चंद्रकांत पाटील सामाजिक कार्यकर्ते व इतर मुलांचे पालक व इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.