सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
जगाच्या नकाशावर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान ची ओळख आहे अश्या माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील दहा कर्मचा-यांना मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सेवेत कायम केले आहे.सर्वच कर्मचारी या सेवेला न्याय देतील, निष्ठ्ने आपले कर्तव्य बजावतील यात मला कोणतीही शंका नाही असे मुख्याधिकारी भणगे यांनी यावेळी सांगितले.
माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी म्हणून सुरेखा भणगे कार्यरत आहेत, कर्जत नगरपरिषद मधील मुख्याधिकारी यांची बदली झाल्याने येथील पद रिक्त आहे , त्यामुळे सुरेखा भणगे यांच्याकडे कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार आहे, हा कार्यभार सांभाळताना त्यांनी कर्जत नगरपरिषद मधील नऊ कर्मचारी यांना सेवेत कायम केले आहे.
माथेरान गिरीस्थान नगरपरिषद प्रशासनात मागील सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एकूण दहा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे यामध्ये आठ सफाई कर्मचारी आणि दोन कार्यलयीन क्लार्क यांचा समावेश आहे.
तत्कालीन माथेरान कौन्सिलचे मी आभारी आहे की त्यांनी या सर्वाना कायम करण्यासाठी चा ठराव केला होता. तसेच तत्कालीन कार्यालयीन अधिक्षक रत्नादीप प्रधान,आस्थापना विभागाचे जयंत वर्तक, सदानंद इंगळे यांचे देखील आभारी आहे की, या सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश तयार करण्यासाठी, सर्व कागद पत्राची पूर्तता केल्यामुळे हे शक्य झाले आहे.
Be First to Comment