विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक संस्थेचा अभ्यास करावा — सुशिल वाघमारे
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
विद्यार्थी हा देशातील उद्याचा उज्वल भविष्य असून त्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक संस्थेचा सुद्धा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश सरचिटणीस सुशिल वाघमारे यांनी केले आहे. पेण तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तालुक्यातील १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महात्मा गांधी वाचनालय येथे करण्यात आला.

यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, सरचिटणीस विजय कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष र.ना.कांबळे, प्रा.एल.एन.कुमारे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, माजी नगरसेवक पांडुरंग जाधव, नगरसेविका प्रतिभा जाधव, बौद्धाचार्य मारुती शिंदे अदिंसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या प्रोत्साहनसाठी जो गुणगौरव समारंभ आखला आहे तो वाखण्याजोगी आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये उंच भरारी घेऊन आपले नांव लौकिक करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन कांबळे, मंगेश कांबळे, नरेश गायकवाड, मनोज शिंदे आदींनी मेहनत घेतली.







Be First to Comment