खा. सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागोठण्यातील जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : जिल्ह्यातील ८० स्पर्धकांचा सहभाग
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
खा. सुनील तटकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने येथील मोटेच्या (चौकोनी) तलावात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अॅक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या स्पर्धेत १० गटातील सुमारे ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील १४ वर्षाखालील वयोगटात सहभागी झालेला खा. सुनील तटकरे यांचा नातू कु. आर्यव्रत अनिकेत तटकरे याने पूर्ण केलेली स्पर्धा हे सर्वांचे आकर्षण ठरले. तर पुढील वर्षी अधिक नियोजनबद्ध व भव्य स्पर्धा भरविण्यात येईल असे आ. अनिकेतभाई तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आ. आदितीताई तटकरे, आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, चंद्रकांत गायकवाड, रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, कार्याध्यक्ष सचिन कळसकर, स्पर्धेचे प्रमुख आयोजक व राष्ट्रवादीक युवकचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, राकेश शिंदे, सुधाकर जवके, कृष्णा धामणे, एकनाथ ठाकूर, झिमाशेठ कोकरे, प्रथमेश काळे, सिद्धेश काळे, विक्रांत घासे, प्रमोद जांबेकर, रोहिदास हातनोलकर, मंगेश तेरडे, प्रकाश मोरे, अखलाक पानसरे, राजेश पिंपळे, मधुकर महाडिक, मनोज टके, चेतन टके, केतन भोय, आशा शिर्के, रिचा धात्रक, सुजाता जवके, माधवी महाडिक, प्रतिभा तेरडे, स्नेहल काळे, प्रगती आवाद, निष्ठा विचारे, पल्लवी गोळे, मयुरी महाडिक आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेच्या १० वर्षाखालील मुलांच्या गटात कु. अनय गाडगे, कु. ललित कदम व कु. प्रिन्स काठवले यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. याच गटातील मुलींमध्ये आराध्य चौके प्रथम आली. १२ वर्षाखालील मुला-मुलींच्या गटात तनय लाड, निरव पवार व जीवन ठाकूर या मुलांनी तर कल्याणी जुईकर, महती पाटील व सराह मेम यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले. १४ वर्षाखालील मुलांमध्ये प्रथमेश गर्जे, प्रणव पाटील व आंब्रेश सैकिया यांनी पहिले तीन व मुलींमध्ये हर्षाली म्हात्रे हिने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षाखालील गटात सोहम पाटील, वेदांत शिंदे व पियुष पाटील यांनी पहिले तीन तर देवांशा जाधव व वैष्णवी गुप्ता या मुलींनी पहिले दोन क्रमांक मिळविले. मुलांच्या खुल्या गटात अथर्व लोधी, यदिश कुथे व भारत कुथे यांनी पहिले तीन क्रमांक तर मुलींमध्ये मधुरा पाटील, स्वराली म्हात्रे व पूर्णिमा पाटील यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे, वयाच्या १२ व्या वर्षीच ज्यांनी इंग्लिश चॅनेल पार केले व जलपरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे येथील रुपाली रेपाळे, अॅक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष राजू कोळी, सचिव सुरेंद्र कटोर, गितेश कुथे, रोषण कुथे, सुनील पवार, हरीश यादव, अतिश महाले यांच्यासह सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या नागोठण्यातील सदस्यांनी सहकार्य केले.







Be First to Comment