Press "Enter" to skip to content

रसायनीत वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

वनविभाग अलिबाग वनपरिक्षेत्र पनवेल, परिमंडळ वासांबे मोहोपाडा आणि पत्रकार बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनीतील मौजे रिस परिसरातील सर्व्हे नंबर 69/1 अ मधील पाच हेक्टर जागेत विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.यात साग, जांभूळ,आवळा,खैर, कडूलिंब,करंद आदी जातींच्या 500 वृक्षांची लागवड रिस हद्दीतील वनपरिक्षेत्रात करण्यात आली.

याप्रसंगी माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.उपस्थित मान्यवर माजी सरपंच कृष्णा पारंगे, पत्रकार राकेश खराडे, सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सतिश महाडिक,श्याम म्हस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी औषधी झाडांच्या गुणधर्माविषयी वनरक्षक आनंद सावंत यांनी माहिती दिली.

वृक्षारोपण प्रसंगी वनरक्षक व्हि.जी.कटवदे,वनरक्षक महेश चण्णागिरे, वनरक्षक स्वरांजली बांगर, निवृत्त वनरक्षक कांबळे,पत्रकार बांधव आदींसह वृक्षप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वनविभागाने झाडे लावा,झाडे जगवा,पर्यावरण वाचवा असे आवाहन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.