वृक्ष लागवड करुन ऑक्सिजन ची पातळी वाढवू या : सरपंच गोपीनाथ जाधव
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
वृक्ष लागवड आणी संवर्धन ही काळाची गरज आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनांच्या काळात ऑक्सिजनचे महत्व काय असते हे प्रत्येकाला माहित आहे.पर्यावरणांचा समतोल अबाधित राहण्यासाठी, वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे.आज अनियमित पडणारा पाऊस,ओला, सुका दुष्काळ या सर्व बाबीचा आभ्यास करून वृक्ष लागवड करुन,आपले गाव परिसर हिरवे गार करु या,असे प्रतिपादन वृक्ष लागवड करतांना व्यक्त केले.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी व्यक्त केले.
स्मशानभुमी आणी रस्त्याच्या दुतर्फा च्या ठिकाणी वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याचा संदेश या माध्यमातून दिला.आज रस्तेचे रुंदीकरण साठी मोठ्याप्रमाणावर वृक्ष तोड केली जात आहे.मात्र ती पातळी भरुन काढावी यासाठी रस्त्याच्या दुतर्फा च्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली.पुर्वी अनेक प्रकारची झाडे या मध्ये वनऔषधी सुद्धा होती.संपूर्ण ठिकाणी वृक्षच होती.मात्र विविध कारणास्तव वृक्षांची तोड मोठ्याप्रमाणावर झाल्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे.मात्र निसर्गाचे बदललेले चित्र थांबविण्यांची ताकद वृक्षामध्ये आहे.
यामुळे ग्रूप ग्राम पंचायत माजगांव हद्दीतील असलेले माजगांव, आंबिवली,वारद,येथिल रस्ते, स्मशानभूमी तसेच मोकळी जागेत करंज, सीताफळ, चिंच, आवळा,बांबू, यामध्ये ५०० बाबू व इतर झाडे ८०० एकूण तेराशे झाडे ग्रामपंचायत परिसरात लावण्यात आली.
यावेळी सरपंच गोपीनाथ जाधव, ग्रामसेवक संदीप धारणे,सीआरपी – कमल जाधव,कल्याणी जाधव, रायगड जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी – शिक्षक अनुरथ पाटील, नंदा पाचपिंडे, रेखा जाधव,अंजली विचारे, अशा वर्कर – कविता भोइर, कर्मचारी संतोष काठावले,अदि उपस्थित होती.







Be First to Comment