सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
सर्व शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, पोलीस मित्र समिती सदस्य, सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांची आगामी काळात येणारे आषाढी एकादशी, बकरा ईद, गुरू पौर्णिमा हे सण व त्याच बरोबर सध्याचे राजकीय घडामोडींचे अनुषंगाने नागोठणे पोलिस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.
नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची मिटींग आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या शांतता कमिटी चे सदस्य मोहल्ला कमिटी सदस्य पोलीस मित्र समिती सदस्य तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी समोर संबोधताना असे सांगितले की, संपूर्ण भारतात गोवंश हत्या कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जात असून त्याच अनुषंगाने नागोठणे गावा मध्ये देखील मुस्लिम बांधवांनी यावर्षी बकरा ईद साजरी करत असताना गोवंश हत्या कायद्याचे कुठेही उल्लंघन आपल्याकडून होणार नाही, इतर जाती- धर्मीयांचे भावना दुखावले जाऊ नयेत या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत बकरा ईद ही गोड गोविंदाने गावात साजरी करावी त्याचबरोबर गावामध्ये गोवंश हत्या होत असल्याचे किंवा प्राण्यांचे अपहरण होत असल्याचे हिंदू बांधवांना निर्दशनास येत असेल तर त्यांनी कायदा आपल्या हातात न घेता पोलिसांना कळविण्यात यावे त्या व्यक्तीचे गोपनीय नाव ठेवून संबंधित गुन्हेगारांवर योग्यती कारवाई करण्यात येईल.
त्याचबरोबर सध्याचे महाराष्ट्र राज्यात राजकीय पक्ष घडामोडी चालू असून त्या घडामोडी बद्दल काही राजकीय कार्यकर्ते आपले स्वतःचे वैयक्तिक मत व्हाट्सअप द्वारे मांडत असतात पोस्ट टाकत असतात त्यामुळे गाव पातळीवर दोन गटांमध्ये वाद विवाद होतात आणि आपल्या जवळच्या माणसांपासून आपण दुरावले जातो व गावातील सर्वांशी आपले असलेले अतूट नाते संपुष्टात येतात तरी अशा कोणत्याही व्हाट्सअप द्वारे कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकू नये किंवा कोणतेही कमेंट लिहून पोस्ट करू नये जेणेकरून गावातील शांतता भंग होईल सध्याच्या राजकीय घडामोडी परिस्थितीचा सर्वांनी भान ठेवून गावात आपल्या सर्वांचे संबंध टिकून कसे राहतील याचा विचार करणे गरजेचे आहे.
सध्या पावसाला सुरू असून गावातील पूर परिस्थिती मुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा मी माझ्या मार्गदर्शनाखाली सज्ज ठेवले आहेत असे नारवन यांनी शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये सर्व उपस्थित शांतता कमिटी सदस्यांसमोर सांगितले.
यावेळी माजी सरपंच विलास चौलकर, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते भाई टक्के, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, नागोठणे शहराध्यक्ष अशपाक पानसरे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार, अल्पसंख्याक समाज रोहा तालुका अध्यक्ष याकूब सय्यद, तसहुर अधिकारी, मंगेश तिरडे, हुसेन पठाण, संतोष गायकवाड, धनंजय जगताप, अकबर पठाण, दिनेश घाग, चेतन कामथे, दानिश अधिकारी, मुजफ्फर कडवेकर सभेसाठी उपस्थित होते.
शांतता कमिटी सदस्य मोहल्ला कमिटी सदस्य पोलीस मित्र कमिटी सदस्य त्याचबरोबर सर्व पक्ष पदाधिकारी या सर्वांचे मीटिंग साठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस विनोद पाटील यांनी आभार मानले.







Be First to Comment