Press "Enter" to skip to content

डॉ अनिल परमार यांनी स्विकारली रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या प्रांतपाल पदाची सुत्रे

सिटी बेल ∆ पनवेल ∆

रोटेरियन डॉ अनिल परमार ह्यांनी ३ जुलै रोजी, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल म्हणून सुत्रे स्विकारली.

मावळते प्रांतपाल रोटेरियन पंकज शहा ह्यांनी डॉ अनिल ह्यांना प्रांतपालपदाची काॅलर घातली. ह्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय रोटरी फाऊंडेशनचे प्रमुख ट्रस्टी डॉ भरत पंड्या, आंतरराष्ट्रीय रोटरीचे डायरेक्टर डॉ महेश कोटबागी, परेश ठाकूर, जे एम म्हात्रे, माजी प्रांतपाल रवी वडलामानी व रोटरी जगतातील बरेच सन्माननीय सदस्य व ६०० हून अधिक पुणे व पनवेल विभागातील रोटेरियन उपस्थित होते.

रो डॉ अनिल परमार हे मागील २९ वर्षांपासून फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत व पनवेल विभागातून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रातपाल होणारे ४ थे रोटेरियन आहेत. रोटरी वर्ष २२-२३ साठी डॉ परमार प्रांतपाल असणं ही पनवेलसाठी खरंच एक सन्मानाची बाब आहे. डॉ परमार हे मागील २८ वर्षांपासून रोटरी क्लब न्यु पनवेलचे सदस्य आहेत. ह्या क्लबचे खांदा काॅलनी येथे मेडिकल सेंटर आहे जेथे ब्लड बँक, डायलिसिस सेंटर व डे केअर सेंटर आहे.

ह्या प्रसंगी समाजोपयोगी असे बरेच प्रकल्प घोषित करण्यात आले तसेच रोटरी फाऊंडेशनला भरघोस आर्थिक पाठबळ देणाऱ्या देणगीदारांचे सत्कार करण्यात आले. डॉ अनिल परमार ह्यांनी रोटरी संस्थेची समाजापर्यंत अधिकाधिक मदत पोचविण्याची व अधिक मोठे, चांगले व प्रभावी तसेच दीर्घकाळ समाजाला उपयुक्त ठरतील प्रकल्प राबविण्याची त्यांची इच्छा व नियोजन व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.