Press "Enter" to skip to content

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार

संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी कर्जत नगर परिषद प्रशासन सज्ज

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून शासन, प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर सन 2022 नैसर्गिक आपत्तीसाठी कर्जत नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे नगरपरिषदेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती नगरपरिषद कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

संभाव्य नैसर्गिक आपत्ती चा पार्श्वभूमीवर कर्जत नगर परिषदेने दि.5 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता कर्जत नगर परिषदेच्या सभागृह एका बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगरसेवक बळवंत घुमरे तसेच व्यापारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि रेस क्यू टीमचे सदस्य आदी उपस्थित होते.

कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र गोसावी यांनी प्रास्ताविकात मागील वर्षी पुराचे संकट आले होते त्यावर आपण सर्वांच्या सहकार्याने मात केली, यावर्षी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे याबाबत त्यांनी सभागृहात माहिती दिली, उपस्थित पदाधिकारी, सदस्य यांना काही सूचना करायच्या असतील तर त्या सुचवाव्यात त्या मध्ये बदल करण्यात येईल असे सांगितले.

नगरपरिषद कार्यालयात मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सुवर्णा जोशी याप्रसंगी मुख्याधिकारी सुरेखा भणगे

मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी मागील नैसर्गिक आपत्तीची माहिती डोळ्यासमोर ठेवून हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, यामध्ये शहरातील सर्व संस्था, व्यापारी, रेस क्यू टीम, नागरिक, पत्रकार यांचा समावेश करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे, संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे,नगरपरिषद कार्यालयात नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे त्याठिकाणी नगरपरिषद कर्मचारी यांच्या चोवीस तास ड्युटया लावण्यात आल्या आहेत.नियंत्रण कक्षाचा नंबर 02148-222033 व 02148-221111 असा आहे.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही मात्र आली तर त्यावर मात करण्यासाठी नगरपरिषद यंत्रणा सज्ज आहे असे सांगितले, नैसर्गिक आपत्ती येऊच नये अशी आपण सर्व जण देवाकडे प्रार्थना करू असे त्यांनी सांगितले.उपस्थित नागरिकांपैकी विकास यांनी विचार मांडले तर सुमित गुरव यांनी मागील पूर परिस्थितीचा अनुभव पाहता आपल्याकडे बोट पाहिजे असे सांगितले.

याप्रसंगी विकास चित्ते, विष्णू कडू, जयंतीलाल परमार, सुमित गुरव, शैलेश सातपुते,रमेश ओसवाल, अभिजित मोरबेकर, अक्षय गुप्ता,स्वप्नील नामदास आदी सह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.