Press "Enter" to skip to content

मराठा भवन उभारण्यासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची नगरसेवक गणेश कडू यांनी मागणी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

पनवेल महानगरपालिकेचे महाविकास आघाडीचे नगरसेवक गणेश कडू यांनी मराठा भवन उभारण्यासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

पनवेल महानगर पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक गणेश कडू यांनी मराठा समाजाचे भवन उभारण्यासाठी शहराच्या प्रवेश द्वार परिसरात भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात मराठा समाज वास्तव्यात असून त्यांच्या समाजाच्या विविध कार्यक्रम व उपक्रमासाठी एक भवन उभारणे गरजेचे आहे. यासाठी पनवेल महानगरपालिकेने लक्ष घालून पनवेल महापालिकेच्या प्रवेशद्वार परिसरात भूखंड उपब्ध करून द्वारा अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहरातील प्रवेशद्वार व दर्शनीय भागात असलेला भूखंड महानगरपालिकेने देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे व या वर्षाअखेरीस आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास आहे‌. ‌ – गणेश कडू (नगरसेवक)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.