Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद क्षेत्रात नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचा पाहणी दौरा

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून शासन, प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी नगरपरिषद क्षेत्रात पाहणी केली.

नगरपरिषद क्षेत्रात मुद्रे बुद्रुक गावठाण भाग, गुंडगे, भिसेगाव या भागात अतिवृष्टीमुळे भुख्खलन, दरड कोसळ्याचे प्रकार पूर्वी झाले होते त्या परिसरात पाहणी केली व त्यांना तात्पुरते स्थलांतर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. नगरपरिषद क्षेत्रातील मुख्य नाले, गटारे यांची साफ सफाई योग्य झाली आहे का याची पाहणी केली.नदी परिसरातील भागाची पाहणी केली.

नगरपरिषद क्षेत्रात पाहणी करताना नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी सुरेखा भणगे आणि स्थानिक नगरसेविका

चार फाटा ते न्यू बिकानेर रस्ता हा रस्ता भिसेगाव मध्ये जातो या रस्त्याचे काम अर्धवट आहे म्हणजे रस्त्याची एक बाजू पूर्ण झाली आहे तो रस्ता सध्या रहदारी साठी सुरू आहे मात्र पावसाळ्यात आजू बाजूला पाणी साठल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने दोन दिवसापूर्वी चारचाकी वाहन हे रस्त्याच्या खाली उतरले होते त्या रस्त्याची पाहणी करून पावसाळ्यात हा रस्ता वन वे करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत त्याठिकाणी फलक लावण्यात येतील असे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले.

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी कर्जत नगर परिषद क्षेत्रात ज्या ठिकाणी फिरल्या त्या ठिकाणीचे स्थानिक नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, बळवंत घुमरे, नगरसेविका वैशाली मोरे, संचिता पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या सह पाहणी केली, यावेळी नगर अभियंता मनिष गायकवाड, नगर रचना लक्ष्मण माने, सुदाम म्हसे, सुनिल लाड नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.