Press "Enter" to skip to content

मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची संकल्पना

माथेरान मध्ये आपत्ती व्यवस्थापन ग्रुपची स्थापना

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

माथेरान मध्ये मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या संकल्पनेतून माथेरान आपत्ती व्यवस्थापन ग्रुपची स्थापना केली असून या मध्ये माथेरान अधिक्षक दिशांत देशपांङे, माथेरानचे एपीआय शेखर लव्हे, वनविभागाचे आरेफो जंगम, नगरपालिकेचे कर्मचारी रेक्यू टीम चे सदस्य राजकीय पक्षांचे प्रमुख सामाजिक स्थरावर काम करणारे, तसेच पत्रकार व इतर विविध प्रकारे मदत करणा-या व्यक्तिचा समावेश आहे.

माथेरान हे ङोंगर माथ्यावर तसेच जंगलाने व्यापलेले पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्य वृष्टी होत असते येथे पावसाळ्यात किमान पाच ते सहा हजार मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद शासनदरबारी आहे, इथे अनेक झाङे जुनी झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात ती पङतात तसेच जमिनीची धूप देखील मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ आपत्ती व्यवस्थापनास त्यांची माहीती मिळावी तसेच मदत पोहचण्यास विलंब होऊ नये हा या ग्रुप स्थापनेचा मुख उद्देश्य असल्याचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी स्पष्ट केले.

माथेरान मध्ये 3 जून 2020 साली निसर्ग चक्री वादळात घरावर झाङे पङून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांची पुनरावृत्ती होऊ नये या करता माथेरान आपत्ती व्यवस्थापन ग्रुप महत्वाचा ठरू शकतो तसेच काही जीर्ण झालेल्या झाडांच्या घरावर आलेल्या फांद्या तोडण्यास परवानगी दिल्यास घराचे नुकसान टळून आपत्ती व्यवस्थापनचा भार देखील कमी होऊ शक्यतो याचाही विचार झाल्यास या ग्रुप चा उद्देश सफल होईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.