Press "Enter" to skip to content

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांची संजय राजाराम सोनावणे यांनी घेतली भेट

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्य भाजपा उपाध्यक्ष, राज्य महसूल पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भंडारी यांची मुंबई येथील निवासस्थानी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान चे राज्याध्यक्ष, नामवंत उद्योजक, ज्येष्ठ समाजसेवक, दैनिक लोकशक्ती चे संपादक डॉ. संजय राजाराम सोनावणे व ऍड एफ.एम.ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सध्याचे राजकारण तसेच इतर विविध विषयांवरती त्यांची चर्चा झाली. पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये विकासात्मक कामे करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन माधव भंडारी यांनी यावेळी त्यांना दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.