Press "Enter" to skip to content

काँग्रेस च्या सहकार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मल्लिनाथ गायकवाड यांची नियुक्ती

सिटी बेल ∆ पनवेल ∆

काँग्रेस पक्ष्याच्या सहकार विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

दादरच्या टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभ हस्ते व सहकार विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. शुभांगी शेरेकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

मल्लिनाथ गायकवाड हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून सहकार क्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थाची नोंदणी, कॉन्व्हयन्स डीड, सदनिकांचे सिडको हसतांतरण ई. कामात गेली सुमारे 20/22 वर्ष्ये त्यांनी काम केलेले असल्याने पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत यांनी त्यांची शिफारस प्रदेश अध्यक्षा शुभांगी शेरेकर यांच्याकडे केली होती, त्याला प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मान्यता दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीचा भविष्यकाळात काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल असा विश्वास जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत यांनी त्यांचे अभिनंदन करतांना व्यक्त केला आहे. त्याच बरोबर पनवेल शहर सहकार विभागाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून अरुण कुंभार व प्रदेश सरचिटणीस म्हणून ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मल्लिनाथ गायकवाड यांच्या निवडीचे सर्वच स्तरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.