लायन्स क्लब म्हणजे समाजाच्या गरजा ओळखून मदत करणारी संस्था – गीता धोटे
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
खोपोली शहरात सामजिक कार्य करण्यासाठी लायन्स क्लब ची स्थापाना झाली या छोट्याशा रोपट्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याने गोल्डन जुबली मोठ्या उत्सव कपॉलिन रिसॉर्ड मध्ये साजरा करण्यात आला यावेळी 50 वर्षात केलेल्या कामांचा आढावा सांगून लाखो लोकांची सेवा केल्याचे मांडून जवळपास सहकार्य करणाऱ्या सामजिक संस्था ,कार्यकर्ते सह कारखानदारी अशा 61 जणांना सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अल्टा लॅबोरिटीज च्या व्यस्थापक गीता ताई धोटे यांनी आपले मौलिक विचार मांडताना लायन्स क्लब म्हणजे समाजाच्या गरजा ओळखून मदत करणारी संस्था असल्याचे मत त्यांनी व्यक्त करीत कौतुकाची थाप मारली
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स जिल्हा प्रमुख लुनकरण तावरी अध्यक्ष महेश राठी,सेक्रेटरी शिल्पा मोदी ( चुरी) खजिनदार कल्पेश शाह लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट चे राजेंद्र केजरीवाल उपाध्यक्ष दिलीप पोरवाल यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी या 50 वर्षाच्या वाटचालीत केलेल्या कायमचा आढावा लायन्स अल्टा कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी बाळाराम म्हात्रे यांनी सादर करताना नेत्र तपासणी, ऑप्रेशन, जयफूड फूट प्रयोजकर अपंगांना आधार दिला गांधी जयंती ला 37121 गांधीजी बनवून सामजिक संदेश दिल्याने या उपक्रमाची ग्रीनिज बुकात नोंद झाली तसेच कोविड मध्ये डायलिसिस सेंटर ,सर्व्हिस सेंटर ,डोळ्यांची तपासणी सुरूच असून गरजूंना कमी दरात उपचार अन्य वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या असून गगनगिरी आश्रम येथे ही डायलिसिस सेंटर सुरू आहे या सर्व शिबिरात आता पर्यत लाखो गरजवंत नागरिकांनी लाभ घेतल्याचे सांगून हजारो उपक्रम सादर केल्याची माहिती दिली.
यावेळी समाजात मोठे योगदान असणारे जय किशन जाखोटीया, आर के केजरीवाल,ए के खंडेलवाल ,अल्टा लॅबोरेटरीज कंपनी च्या गीता धोटे परिवार,गार्गी चे राज गावडे ,आयुष्य अनिल मित्तल ,माजी नगराध्यक्षा सुमन औसरमल,माजी दत्तात्रेय मसुरकर, मुख्याधिकारी अनुप दुरे,माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम ,खालापूर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम ,डॉ आय सी बोरणा डॉ जोशी,डॉ गोवंडे ,डॉ पाटील ,डॉ आशिष नाईक, डॉ सुनील देवडीकर,हेल्थ फाऊंडेशन अलिबाग ,पोलीस निरीक्षक अनिल विभूते,केरला क्लचर्स सोसायटी,रोटरी क्लब खोपोली, अपघात ग्रस्त संस्था , सहज सेवा संस्था ,मुस्लिम वेल्फर असोशियन ,पंकज मोरे,यशवंती हायकर्स ,बुज लाप्टर क्लब ,हनुमान मित्र मंडळ,ब्राम्हण सभा खोपोली, जेष्ट नागरिक सभा,अजित भोसले कटर्स , प्रल्हाद अत्रे,खेमंत टेलर , पत्रकार मित्र प्रेस क्लब यासह अन्य नागरिकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाची रंगत वाढविण्याचे काम सूत्रसंचालनाच्या माध्यमातून लायन्स सचिन बोरणा यांनी केले तर विशेष म्हणजे पुष्पगुच्छ यावर खर्च न करता त्याच्या खर्चाचा धनादेश शॅलोम एज्युकेशन या अंध मुलांच्या संस्थेला देण्यात आले यावेळी लायन्स ही संस्था समाजाच्या गरजा ओळखून काम करणारी संस्था असल्याने अशा संस्थांना कंपनीच्या माध्यमातून मदत करण्यात आली असल्याचे अल्टा लॅबोरिटीज कंपनीच्या गीता धोटे मॅडम यांनी सांगितले तर माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी 50 वर्षात अनेक उपक्रम राबवून नागरिकांची उपक्रमाच्या माध्यमातून सेवा केली त्यामुळे या कौतुकास्पद कामगिरी चे कौतुक करावे तेव्हडे थोडेच आहेत असे आपले विचार व्यक्त करताना मसुरकर यांनी सांगितले शेवटी आभार प्रदर्शन करून अंध संगीतकारांचा आनंद सर्वाना घेतला.







Be First to Comment