खोपोली ते वाशिवली एस.टी.बस सेवा सुरु करण्याची मागणी
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
खोपोलीत अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेज येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात.मात्र सकाळी ११ : १५ वाजता एस.टी.बस सुटत असल्यामुळे पुन्हा एस.टी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वहानांने प्रवास करावा लागत आहे .यांचाच फटका विद्यार्थी पालक वर्गांना बसत आहे.यामुळे माजी सरपंच हरेश पाटील – माडप यांनी कर्जत डेपो चे व्यवस्थापक यादव तसेच पेण येथिल वर्तक मॅडम वाहतूक परिवहन विभागाकडे दुपारी १२:३० बस सुरु करा.अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
खोपोली येथून १२ :३० वाजता एस.टी सुटल्यास सर्व विद्यार्थ्यांना ही एस.टी मिळू शकते. यामुळे शाळकरी मुलांना खाजगी वहानांने प्रवास करण्यांची गरज नाही. त्याच बरोबर खिशाला बसलेली झळ कोठेतरी थांबेल.मात्र गेले अनेक महिने विद्यार्थ्यांना नियोजित वेळेवर एस.टी मिळत नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.त्याच बरोबर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खाजगी वहानं मिळे पर्यंत ताटकळत उभे राहत असल्यांचे विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
पाटील यांनी वाहतूक परिवहन यांची भेट घेवून विद्यार्थ्यांची होत असलेली गैर सोय सांगितल्यांने आपण लवकरच एस.टी सुरु करत असल्यांचे त्यांनी मानस व्यक्त केला.यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार नसून या माध्यमातून त्यांना मोठा शैक्षणिक लाभ होणार असल्यामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहे.
माझे कॉलेज ११:३० वाजता सुटत असल्यामुळे तो पर्यंत एस.टी खोपोलीतून गेलेली असते.मात्र ती १२ : ३० ला सुटल्यास त्याच दुपारी २ किंवा ३ वाजता सुटल्यास जे विद्यार्थी क्लास करून येतात त्यांना सुद्धा मिळेल, शिवाय खाजगी वहानांने खर्च होणारे पैश्यांची बचत होइल. ( विद्यार्थी – प्रचिती जाधव )







Be First to Comment